Rinku Singh New House: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने खरेदी केले ड्रीम हाउस, खर्च केले करोडो रुपये

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी रिंकू सिंग आपल्या कुटुंबासह नवीन घरात शिफ्ट झाला. आता त्यांचा नवीन पत्ता ओझोन सिटी येथील गोल्डन इस्टेटमधील कोठी क्रमांक 38 हा असेल. रिंकू सिंगचे नवीन घर 500 स्क्वेअर यार्डचे आहे.

Rinku Singh New House: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने खरेदी केले ड्रीम हाउस, खर्च केले करोडो रुपये
Rinku Singh New Home (Photo Credit - X)

Rinku Singh New House: भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार फलंदाज रिंकू सिंगने अलीगढमधील ओझोन सिटीमधील गोल्डन इस्टेटमध्ये नवीन घर विकत घेतले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी रिंकू सिंग आपल्या कुटुंबासह नवीन घरात शिफ्ट झाला. आता त्यांचा नवीन पत्ता ओझोन सिटी येथील गोल्डन इस्टेटमधील कोठी क्रमांक 38 हा असेल. रिंकू सिंगचे नवीन घर 500 स्क्वेअर यार्डचे आहे. उल्लेखनीय आहे की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रिंकू सिंग बुधवारी अलिगढला पोहोचला. सर्वप्रथम त्यांने तहसील नोंदणी कार्यालयात जाऊन घराची नोंदणी करून घेतली. रिंकू सिंगला आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने कायम ठेवले आहे. फ्रँचायझीने 13 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवून नवीन उच्चांक गाठला आहे, जे त्याच्या मागील 55 लाख रुपयांच्या मूल्यांकनापेक्षा 24 पट जास्त आहे. रिंकू व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्सने वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांसारख्या इतर खेळाडूंनाही कायम ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement