Special Flight Lands at Barbados Airport:: एअर इंडियाचे विशेष विमान बार्बाडोस विमानतळावर उतरले; भारतीय संघ मायदेशी परतणार
एअर इंडियाचे एक स्पेशल विमान यासाठी बारबोडोसमध्ये दाखल झाले असून या विमानाने भारतीय संघाचा परतीचा प्रवास हा सुरु झाला आहे.
भारतानं 29 जूनला बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 7 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर बारबाडोसमध्ये चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आला होता. यानंतर बारबाडोस विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली होती. बारबाडोसमध्ये असलेले खेळाडू आणि पत्रकारांना सुरक्षित पणे बाहेर काढण्यासाठी बिसीसीआयकडून खास चार्टड विमानाची सोय केली होती. एअर इंडियाचे एक स्पेशल विमान यासाठी बारबोडोसमध्ये दाखल झाले असून या विमानाने भारतीय संघाचा परतीचा प्रवास हा सुरु झाला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)