IND vs SA: दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीमध्ये पोहोचली, अर्शदीप आणि चहरने केक कापून आनंद केला साजरा (Watch Video)

भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव केला होता. अर्शदीप सिंह आणि दीपक चहर या जोडीने आफ्रिकेच्या अव्वल फळीला उद्ध्वस्त केले होते.

Photo Credit - Twitter

भारतीय क्रिकेट संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी गुवाहाटीला (Guwahati) पोहोचला आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर रोजी बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव केला होता. अर्शदीप सिंह आणि दीपक चहर या जोडीने आफ्रिकेच्या अव्वल फळीला उद्ध्वस्त केले होते. बीसीसीआयने (BCCI) अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्शदीप सिंह आणि दीपक चहर पहिला सामना जिंकल्यानंतर केक कापताना दिसत आहेत. त्याचवेळी विमानतळावर दोन्ही संघ गप्पा मारतानाही पाहायला मिळतात.

पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement