T20 World Cup 2022: टीम इंडिया पोहोचली रॉटनेस्ट बेटावर तर विराट कोहलीचा हा फोटो होत आहे व्हायरल (Watch Video)

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डच्या अधिकृत सराव सामन्यापूर्वी दोन सराव सामने खेळण्याचा निर्णय घेतला, जो ते वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतील. त्यापैकी एक सामना झाला असून अजून एक सराव सामना बाकी आहे.

T20 World Cup 2022: टीम इंडिया पोहोचली रॉटनेस्ट बेटावर तर विराट कोहलीचा हा फोटो होत आहे व्हायरल (Watch Video)
Photo Credit - Twitter

टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) तयारीसाठी टीम इंडिया (Team India) सुमारे 20 दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला पोहोचली होती. भारतीय संघाने टी-20 वर्ल्डच्या अधिकृत सराव सामन्यापूर्वी दोन सराव सामने खेळण्याचा निर्णय घेतला, जो ते वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतील. त्यापैकी एक सामना झाला असून अजून एक सराव सामना बाकी आहे. यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे 17 आणि 19 ऑक्टोबरला सराव सामने खेळणार आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी, भारतीय संघाला एक दिवसाची विश्रांती मिळाली, ज्यामध्ये सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचारी रॉटनेस्ट आयलंडला भेट देण्यासाठी पोहोचले. बीसीसीआयने या खास दिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातून विराट कोहलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2022 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).