IND vs IRE: टीम इंडिया आयर्लंडला रवाना, रिंकू सिंग, शिवम दुबे यांचा फ्लाइटमध्ये मस्ती करतानाचा फोटो व्हायरल

भारतीय संघ 15 ऑगस्टला नवा कर्णधार जसप्रीत बुमराहसह (Jaspreet Bumrah) आयर्लंडला रवाना झाला आहे. या दौऱ्यासाठी आयपीएल 2023 मध्ये बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.

Team India Leaves for Ireland: भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात 18 ऑगस्टपासून टी-20 मालिका (T20 Series) सुरु होणार आहे. पहिला सामना सकाळी साडेसात वाजता होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ 15 ऑगस्टला नवा कर्णधार जसप्रीत बुमराहसह (Jaspreet Bumrah) आयर्लंडला रवाना झाला आहे. या दौऱ्यासाठी आयपीएल 2023 मध्ये बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये रिंकू सिंग, जितेश शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, शाहबाज अहमद आणि रवी बिश्नोई यांना स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर रवाना झाल्याचे फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केली आहेत. ज्यामध्ये रिंकू सिंग फ्लाइटमध्ये झोपलेला दिसली होता. कॅमेरामन फोटो काढण्यासाठी त्याच्याकडे सरकताच तो जागा झाला. युवा खेळाडू कर्णधार जसप्रीत बुमराहसोबत मस्ती करताना दिसले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now