IND vs NZ 3rd ODI Live: न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपकडे टीम इंडियाची नजर, थोड्याच वेळात होणार टाॅस

तसेच हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत.

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना काही वेळात खेळवला जाणार आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे त्याची नजर आहे. यापूर्वीच्या मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता. तसेच हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. तसेच भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement