IND W vs SA W, U19 WC: टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून केला पराभव, श्वेता सेहरावत आणि शेफाली वर्मा यांनी खेळली तुफानी खेळी
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर सिमोन लॉरेन्सने सर्वाधिक 61 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार शेफाली वर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
IND W vs SA W, U19 WC: महिला अंडर-19 विश्वचषक 2023 आजपासून सुरू झाला आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर सिमोन लॉरेन्सने सर्वाधिक 61 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार शेफाली वर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाने लक्ष्याचा पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात केली. श्वेता सेहरावत आणि शेफाली वर्मा यांनी धडाकेबाज खेळी खेळली. टीम इंडियाने अवघ्या एका षटकात 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून श्वेता सेहरावतने सर्वाधिक नाबाद 92 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅडिसन लँडसमॅन, मियाने स्मिथ आणि शेषनी नायडू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाचा पुढचा सामना 16 जानेवारीला UAE सोबत आहे.