IND vs BAN 2nd Test Day 4: टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून केला पराभव, मालिका 2-0 ने केली क्लीन स्वीप
श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
IND vs BAN 2nd Test: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी (रविवार) 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी मिळून आणखी तीन विकेट घेतल्यावर टीम इंडिया हरेल असं वाटत होतं, पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विननं हे होऊ दिलं नाही. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)