IND vs NZ 2nd Test 2024: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; बीसीसीआयकडून व्हिडिओ शेअर

टीम इंडिया आणि न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा आमनेसामने येणाप आहेत. पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता त्याचा बचपा टीम इंडिया काढणार आहे. त्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Photo Credit- X

IND vs NZ 2nd Test 2024: दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ पुण्यात पोहोचला आहे. दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून (IND VS NZ) 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. मायभूमीवर भारताचा पराभव झाल्याने चाहते प्रचंड नाराज आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला दुसरी कसोटी जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणायची आहे. (Bangladesh vs South Africa 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळापूर्वी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 6 विकेटवर 140 धावा; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून)

बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now