Team India कानपूरमध्ये दाखल, दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेश संघाशी सामना; BCCI कडून व्हिडिओ पोस्ट

दोन्ही संघांमधील हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचली आहे.

Team India (Photo Credit - X)

IND vs BAN 2nd Test 2024: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका (IND vs BAN Test Series 2024) खेळवली जात आहे. यांतील पहिला सामना चेन्नई (Chennai) येथे खेळवला गेला. जिथे भारतीय संघाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचली आहे. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया कानपूरला पोहोचली 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)