Team India कानपूरमध्ये दाखल, दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेश संघाशी सामना; BCCI कडून व्हिडिओ पोस्ट

IND vs BAN दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचली आहे.

Team India कानपूरमध्ये दाखल, दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेश संघाशी सामना; BCCI कडून व्हिडिओ पोस्ट
Team India (Photo Credit - X)

IND vs BAN 2nd Test 2024: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका (IND vs BAN Test Series 2024) खेळवली जात आहे. यांतील पहिला सामना चेन्नई (Chennai) येथे खेळवला गेला. जिथे भारतीय संघाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचली आहे. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया कानपूरला पोहोचली 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).