Team India Arrived In Harare: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी हरारेला पोहोचली, Watch Video
या मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे येथे होणार आहे. शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या संघातील काही खेळाडूंचाही या संघात समावेश आहे.
Team India Arrived In Harare: झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया मंगळवारी हरारे येथे पोहोचली. यावेळचा संघाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताला पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे येथे होणार आहे. शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या संघातील काही खेळाडूंचाही या संघात समावेश आहे. मात्र, वादळामुळे ते सध्या बार्बाडोसमध्ये अडकून पडले आहेत, मात्र बाकीचे खेळाडू जे भारतात होते ते मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण (फक्त या दौऱ्यासाठी) सोबत झिम्बाब्वेला रवाना झाले. बार्बाडोसमध्ये अडकलेल्या खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. भारतात आल्यानंतर हे खेळाडू झिम्बाब्वेला जाणार आहेत. बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या 2 टी-20 सामन्यासाठी 3 नवीन खेळाडूंना बदली म्हणून पाठवले आहे. (हेही वाचा: Rohit, Kohli, Jadeja Farewell: BCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना विशेष फेअरवेल. पाहा पोस्ट)
पहा व्हिडिओ-
BREAKING: Team India has arrived in Harare for the Zimbabwe series.
Watch these exclusive visuals captured by @rohitjuglan.#INDvsZIM @ThumsUpOfficial pic.twitter.com/dWACQ0T6cj
— RevSportz Global (@RevSportzGlobal) July 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

