Team India All the Way: पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे केले अभिनंदन

एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सात गडी राखून जोरदार विजय नोंदवला. टीम इंडियाचे अभिनंदन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. अहमदाबादमध्ये आज एक उत्तम विजय, सर्वांगीण उत्कृष्टतेने. संघाचे अभिनंदन आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा. असे मोदी यांनी लिहले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement