T20 World Cup 2022: सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, हे दोन संघ भारताविरुद्ध भिडणार

सुपर 12 फेरीत थेट पोहोचणाऱ्या संघांचे 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होतील, तर पहिल्या फेरीतील संघांचे सराव सामने 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जातील.

Team India (Photo Credit - Twitter)

ICC T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10 ते 19 ऑक्टोबर दरम्यान एकूण 15 सराव सामने खेळवले जाणार आहेत. या काळात भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. भारताचा पहिला सराव सामना 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यानंतर 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. सुपर 12 फेरीत थेट पोहोचणाऱ्या संघांचे 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होतील, तर पहिल्या फेरीतील संघांचे सराव सामने 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जातील.

T20 विश्वचषक 2022 सराव सामन्याचे वेळापत्रक

10 ऑक्टोबर: वेस्ट इंडिज विरुद्ध यूएई, स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड, श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे.

11 ऑक्टोबर: नामिबिया विरुद्ध आयर्लंड

12 ऑक्टोबर: वेस्ट इंडिज विरुद्ध नेदरलँड

13 ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध नामिबिया, श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, स्कॉटलंड विरुद्ध यूएई

17 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश

19 ऑक्टोबर: अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड विरुद्ध भारत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)