T20 World Cup 2022: इंग्लंडने भारताला T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर काढल्यानंतर व्हायरल झाले MS Dhoni चे जुने ट्विट (See)

2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Photo Credit - Dhoni

टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी अॅडलेडमध्ये खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 6 विकेट गमावत 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने 16 षटकांत एकही विकेट न गमावता 170 धावा केल्या. अशाप्रकारे 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. यानंतर आता माजी कर्णधार एमएस धोनीचे एक जुने ट्विट व्हायरल झाले आहे. 2 डिसेंबर 2011 रोजी केलेल्या ट्विटमध्ये धोनीने लिहिले होते, 'ओके मित्रांनो रोहन राठौरचे EMPTINESS ऐका.' आयसीसी स्पर्धेत निराशा पदरी पडल्यानंतर हे ट्विट भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांमध्ये व्हायरल झाले होते. आता हेच ट्विट पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)