T20 World Cup 2021: केवळ ‘हे’ दोन संघ इंग्लंडला पराभूत करू शकतात, विश्वचषक जेतेपदासाठी Kevin Pietersen ने निवडले आघाडीचे संघ

पीटरसनने इंग्लंडला पराभूत करण्यासाठी बाबर आजमच्या पाकिस्तान आणि मोहम्मद नबीच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघावर दाव लावला.

जोस बटलर आणि इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: इंग्लंडचा (England) माजी फलंदाज महान केविन पीटरसनने (Kevin Pietersen) दोन संघ निवडले आहेत जे सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला पराभूत करू शकतात. पीटरसनने इंग्लंडला पराभूत करण्यासाठी बाबर आजमच्या पाकिस्तान (Pakistan) आणि मोहम्मद नबीच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान (Afghanistan) संघावर दाव लावला. पण त्याने या दाव्याला अपवाद सांगत लिहिले की हा सामना शारजाह येथे खेळला गेला तरच दोन्ही आशियाई संघांना मॉर्गनच्या खेळाडूंना मागे टाकण्याची संधी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)