T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलपूर्वी तगडा झटका, दुखापतग्रस्त जेसन रॉय स्पर्धेतून बाद; ‘या’ फलंदाजांचा संघात समावेश

जेम्स व्हिन्सला इंग्लंडच्या उर्वरित मोहिमेसाठी रॉयच्या इंग्लंडच्या संघात स्थान दिले आहे. रॉयची दुखापत हा त्यांच्या मोहिमेदरम्यान इंग्लंडला बसलेला दुसरा मोठा धक्का आहे.

जेसन रॉय (Photo Credit: PTI)

स्टार सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) पोटरीच्या दुखापतीमुळे 2021 च्या उर्वरित ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला असल्याची इंग्लंडने (England) पुष्टी केली आहे. ICC च्या इव्हेंट तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर जेम्स व्हिन्सला (James Vince) इंग्लंडच्या उर्वरित मोहिमेसाठी रॉयच्या इंग्लंडच्या संघात स्थान दिले आहे. रॉयपूर्वी वेगवान गोलंदाज टायमल मिल्स देखील बाहेर पडला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)