IND vs WI 3rd T20: तिसऱ्या टी-20 मॅचचा विजयाचा हिरो सूर्यकुमार यादवने घेतली चाहत्यांची भेट, सेल्फीही घेतला (Watch Video)

बीसीसीआयने (BCCI) सूर्यकुमार यादवचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना भेटत आहेत आणि त्यांना ऑटोग्राफही देत ​​आहेत.

Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मंगळवारी सेंट किट्समध्ये खेळवण्यात आलेला तिसरा टी-20 सामना भारताने जिंकला. या टीम इंडियाच्या विजयाचा हिरो सूर्यकुमार यादव (Surya kumar Yadav) होता, ज्याने 44 चेंडूत 76 धावांची खेळी केली. गेल्या दोन सामन्यांमध्ये सूर्या अपयशी ठरला होता पण तिसऱ्या टी-20 मध्ये तो धावा करताना दिसला. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) सूर्यकुमार यादवचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना भेटत आहेत आणि त्यांना ऑटोग्राफही देत ​​आहेत. जेव्हा चाहत्यांनी सेल्फीची मागणी केली तेव्हा सूर्यकुमारने त्यालाही नकार दिला नाही.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now