SuryaKumar Yadav New Record: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला सूर्या, आपल्या स्फोटक फलंदाजीने केला 'हा' मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही भारतीय फलंदाजाने झळकावलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. या खेळीत सूर्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने (SuyaKumar Yadav) ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आहे. त्याने अवघ्या 24 चेंडूत 50 धावांची खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही भारतीय फलंदाजाने झळकावलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. या खेळीत सूर्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. सूर्याच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर भारत सातत्याने चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement