SuryaKumar Fifty: सूर्याने अवघ्या 24 चेंडूत ठोकले अर्धशतक, भारताची धावसंख्या 370 धावाच्या पुढे
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आज खेळत नाही. कमिन्सच्या जागी जोस हेझलवूडचा समावेश आहे. टीम इंडियाकडून, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजच्या सामन्याचा भाग नाही.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी वनडे जिंकून मालिका काबीज करण्याची संधी आहे. या सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आज खेळत नाही. कमिन्सच्या जागी जोस हेझलवूडचा समावेश आहे. टीम इंडियाकडून, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजच्या सामन्याचा भाग नाही. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्कोर 363/5.