IPL 2023, Match 14 SRH vs PBKS Live Score Update: सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा आठ गडी राखून केला पराभव, राहुल त्रिपाठीने ठोकले अर्धशतक
सनरायझर्स हैदराबादसाठी राहुल त्रिपाठीने नाबाद 74 धावांची सर्वात शानदार खेळी खेळली. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दोन सामने झाले. सुपर संडेचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात झाला. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा आठ गडी राखून पराभव करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक नाबाद 99 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून मयंक मार्कंडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने 17.1 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. सनरायझर्स हैदराबादसाठी राहुल त्रिपाठीने नाबाद 74 धावांची सर्वात शानदार खेळी खेळली. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Match 14. Sunrisers Hyderabad Won by 8 Wicket(s) https://t.co/Di3djWhVcZ #TATAIPL #SRHvPBKS #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2023 11:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

