SRH Beat CSK: सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून केला पराभव, गोलंदाजांनंतर फलंदाजांनीही घातला धुमाकूळ
या सामन्यात हैदराबादने रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्तपुर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना चन्नईने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य दिले.
SRH vs CSK IPL 2024 18th Match: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा 18 सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्तपुर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना चन्नईने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य दिले. चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने अवघ्या 18.1 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. सनरायझर्स हैदराबादसाठी स्टार फलंदाज एडन मार्करामने 50 धावांची तुफानी खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून मोईन अलीने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Match 18. Sunrisers Hyderabad Won by 6 Wicket(s) https://t.co/O4Q3bQNOKn #TATAIPL #IPL2024 #SRHvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 10:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

