Hyderabad Beat Bangalore: सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा 25 धावांनी केला पराभव, कार्तिकची धाडसी खेळी व्यर्थ
या सामन्यात हैदराबादने आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला आहे.
RCB vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादने बेंगळरु समोर 288 धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने 41 चेंडूत 102 धावा, हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा सर्वाधिक धावा केल्या. तर, बेंगळुरूकडून लॉकी फर्ग्युसन सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बेंगळुरु 20 षटकात 262 धावा करु शकली. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्या शानदार खेळीनंतरही आरसीबी संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवू शकला नाही. दोन्ही संघांमधील या सामन्यात एकूण 549 धावा झाल्या. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने 43 धावांत तीन बळी घेतले.
Match 30. Sunrisers Hyderabad Won by 25 Run(s) https://t.co/OOJP7G9JAZ #TATAIPL #IPL2024 #RCBvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2024 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

