IPL 2024 Points Table: सनरायझर्स हैदराबादने सीएसकेचा केला पराभव, सहा विकेटने जिंकला सामना; पॉईंट टेबलमध्ये घेतली 'या' स्थानी झेप

सनरायझर्स हैदराबाद संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला. सीएसकेचा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव आहे. सनरायझर्स पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतले आहेत.

IPL 2024 Points Table: सनरायझर्स हैदराबादने सीएसकेचा केला पराभव, सहा विकेटने जिंकला सामना; पॉईंट टेबलमध्ये घेतली 'या' स्थानी झेप
SRH (Photo Credit - X)

SRH vs CSK IPL 2024 18th Match: आयपीएल 2024 चा 18 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात खेळला गेला. सनरायझर्स हैदराबाद संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला. सीएसकेचा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव आहे. सनरायझर्स पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतले आहेत. या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना CSK ने 5 गडी गमावून 165 धावा केल्या. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने 18.1 षटकात 4 गडी गमावून 166 धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला. या दमदार विजयानंतर सनरायझर्स हैदराबादने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे तर चन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या स्थानवार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 11:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).