ICC World Cup 2023 Promo Video: स्टार स्पोर्ट्सने प्रदर्शित केला वर्ल्ड कपचा प्रोमो, विराट कोहली, रवींद्र जडेजासोबत दिसली शहनाज गिल, पाहा व्हिडिओ
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. तर भारत आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत खेळवला जाईल.
स्टार स्पोर्ट्सने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 साठी प्रोमो जाहीर केला आहे. स्टार स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि शहनाज गिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत. स्टार स्पोर्ट्सने पोस्टमध्ये व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, "2023 सुरू झाल्यापासून, आम्हाला विश्वचषकाने पछाडले आहे! विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि संघाला जगाचा ताबा घेण्याचे वेड आहे! भारत त्यांच्या तिसऱ्या विजेतेपदाच्या वाटेवर आहे. "विश्वचषक स्टारसाठी चीअर करण्यासाठी तयार आहात? स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्टारसाठी ट्यून-इन करा".
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)