LSG vs CSK, Live Score Update: स्टार गोलंदाज रवींद्र जडेजाने मार्कस स्टॉइनिसला अप्रतिम चेंडू टाकून केले क्लीन बोल्ड, फलंदाज पाहतच राहिला (Watch Video)
स्टार गोलंदाज रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मार्कस स्टॉइनिसला अप्रतिम चेंडू टाकून क्लीन बोल्ड केले. जे पाहून फलंदाज आश्चर्यचकित झाला. चेंडू कुठून स्टंपला लागला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. मार्कस स्टॉइनिस पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
आयपीएलचा 44 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs LSG) यांच्यात आयकोना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने पूर्ण वर्चस्व राखले आहे. स्टार गोलंदाज रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मार्कस स्टॉइनिसला अप्रतिम चेंडू टाकून क्लीन बोल्ड केले. जे पाहून फलंदाज आश्चर्यचकित झाला. चेंडू कुठून स्टंपला लागला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. मार्कस स्टॉइनिस पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार मारला. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये त्याने तिसरा बॉल डॉट खेळला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. यानंतर पाचव्या चेंडूची पाळी आली, आणि जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले. आऊट झाल्यानंतर तो स्वतः गोंधळलेला दिसत होता आणि निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याने 4 चेंडूत 5 धावा केल्या.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)