Sri Lanka ODI Squad For India Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा एकदिवसीय संघ जाहीर, 'या' खेळाडूकडे देण्याात आली संघाची कमान

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) मंगळवारी भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. टी-20 फॉर्मेटनंतर चरित असलंकाकडे वनडे संघाचीही कमान सोपवण्यात आली आहे.

Sri Lanka Team (Photo Credit - Twitter)

IND vs SL ODI Series 2024: भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 ऑगस्टपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) मंगळवारी भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. टी-20 फॉर्मेटनंतर चरित असलंकाकडे वनडे संघाचीही कमान सोपवण्यात आली आहे. कुसल मेंडिसचे मन दु:खी झाले. असलंकापूर्वी मेंडिस हा श्रीलंकेच्या वनडे संघाचा कर्णधार होता.

भारत मालिकेसाठी श्रीलंकेचा एकदिवसीय संघ: चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, कामिन्दु मेंडिस, जेनिथ लियानागे, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेलागे, चमिका करुणारतने, महेश थीक्षाना, अकिला धनंजय, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना, असिथा फर्नडो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement