IND vs SL 3rd T20I Toss Update: नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, भारत फलंदाजीसाठी मैदानात; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल.
IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)