IND vs SL 2nd ODI Live: श्रीलंकाने टाॅस जिंकून घेतला प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे.

IND vs SL 2nd ODI Live: श्रीलंकाने टाॅस जिंकून घेतला प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
IND vs SL (Photo Credit - Twitter)

IND vs SL 2nd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने गुवाहाटीमध्ये या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आणखी एका विजयासह रोहित शर्माच्या संघाला मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे. श्रीलंकेसमोर करो या मरो अशी स्थिती आहे. या दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिंकून प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या युझवेंद्र चहलच्या जागी भारताने कुलदीप यादवचा समावेश केला आहे.

पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका: अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित अस्लंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलालेज, लाहिरू कुमारा, कसून राजिथा.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2023 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).