Sri Lanka Beat New Zeland 2nd Test Match: श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा दारुण केला पराभव, 2009 नंतर जिंकली कसोटी मालिका
श्रीलंकाने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 602/5 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचा डाव 88 धावांत आटोपला.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकाने न्युझीलंडचा एक डाव आणि 154 धावांनी पराभव करत मालिकेवर कब्जा केला आहे. श्रीलंकाने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 602/5 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचा डाव 88 धावांत आटोपला. अशाप्रकारे 514 धावांची आघाडी मिळवणाऱ्या श्रीलंकेने न्यूझीलंडला फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण न्युझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 360 धावांवर गारद झाला. श्रीलंकेने 2009 नंतर कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
Nishan Peiris takes six as New Zealand are bowled out for 360 in their second innings; Sri Lanka complete a 2-0 series sweep with an emphatic innings win 👏 https://t.co/mD2JJ1p0rx #SLvNZ pic.twitter.com/uK8l5dWRZ4
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2024 01:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

