Sri Lanka vs West Indies, 3rd T20I Live Toss Update: वेस्ट इंडिजचने नाणेफेक जिंकला; कर्णधार रोव्हमन पॉवेलचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.
Sri Lanka vs West Indies, 3rd T20I Live Toss Update: श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघात (SL vs WI) तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर(Rangiri Dambulla International Stadiu) खेळला जात आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाने वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ त्यांची ताकद पणाला लावून खेळतील. या मालिकेत चरिथ असलंका श्रीलंकेचे नेतृत्व करत आहे. तर, वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होणार आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत श्रीलंकेच्या संघाने नऊ सामने जिंकले आहेत. तर, वेस्ट इंडिजने आठ सामने जिंकले आहेत.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)