SL vs IRE T20 WC 2022: सुपर-12 मध्ये श्रीलंकेची विजयाने सुरुवात, आयर्लंडवर 9 विकेट्सने केली मात

आयर्लंडने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून 128 धावाच करू शकला.

SL vs IRE T20 WC 2022: सुपर-12 मध्ये श्रीलंकेची विजयाने सुरुवात, आयर्लंडवर 9 विकेट्सने केली मात
Photo Credit - Twitter

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) सुपर-12 फेरीत, श्रीलंकेने आयर्लंडविरुद्ध (SL vs IRL) 9 गडी राखून शानदार विजय नोंदवून विजयी पदार्पण केले. आयर्लंडने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून 128 धावाच करू शकला. लॉर्कन टकर आणि पॉल स्टर्लिंग यांच्याशिवाय कोणताही आयरिश फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकला नाही. टकरने 45 आणि स्टर्लिंगने 34 धावा केल्या. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा आणि महिष तेक्षाना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2022 01:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).