IND vs SL T20I Series 2024: टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ अडचणीत, आणखी एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराचे (Nuwan Thushara) डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो भारतासोबतच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

IND vs SL T20I Series 2024: टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ अडचणीत, आणखी एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
Sri Lanka Team (Photo Credit - X)

मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 27 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी श्रीलंकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा आणखी एक स्टार खेळाडू जखमी झाला असून तो संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर आहे. त्यानंतर आता मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका संघाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराचे (Nuwan Thushara) डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो भारतासोबतच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. ईएसपीएनला माहिती देताना संघ व्यवस्थापक महिंदा हलंगोडा यांनी सांगितले की, नुवानच्या डाव्या हाताला दुखापत झाली असली तरी तो गोलंदाजी करू शकत नाही. कारण दुखापत अधिक गंभीर असल्याने त्याला टी-20 मालिकेतून बाहेर ठेवले जाऊ शकते. क्षेत्ररक्षणादरम्यान नुवानच्या बोटाल दुखापत झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement