Sri Lanka Women Won by 3 Wickets: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 3 गडी राखून केला पराभव, विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियासोबत होणार लढत
या रोमांचक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला आहे. यासह श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.
श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. आज या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ यांच्यात डंबुला येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला आहे. यासह श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार चामारी अथापथूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 140 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 37 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधनी आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने 19.5 षटकांत सात गडी गमावून सामना जिंकला. श्रीलंकेसाठी कर्णधार चमारी अथापथूने सर्वाधिक 63 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून सादिया इक्बालने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. आता 28 जुलै रोजी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात संध्याकाळी 7 वाजता अंतिम सामना रंगणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)