Spider Man Across the Spider Verse Hindi Trailer: क्रिकेटपटू Shubman Gill ने लाँच केला ट्रेलर; दिला आहे भारतीय स्पायडर-मॅन पवित्र प्रभाकरला आपला आवाज (Watch Video)
उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूड चित्रपट निर्मितीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा चित्रपट भारतात 1 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Spider Man Across the Spider Verse Hindi Trailer: भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल याने आगामी चित्रपट 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स'चा बहुप्रतिक्षित हिंदी आणि पंजाबी ट्रेलर लॉन्च केला आहे. यामध्ये पहिला भारतीय स्पायडर-मॅन पवित्र प्रभाकर यांची ओळख करून देण्यात आली आहे. मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता, कारण ते लोकप्रिय सुपरहिरो फ्रँचायझीच्या या अनोख्या रुपांतराची आतुरतेने वाट पाहत होते. शुभमन गिलने या व्यक्तिरेखेला आपला आवाज दिला आहे. हा ट्रेलर भारतीय संस्कृती आणि स्पायडर-मॅन विश्वाचे आकर्षक मिश्रण प्रदर्शित करतो, ज्याद्वारे चाहत्यांना रोमांचक सफर अनुभवायला मिळणार आहे. उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूड चित्रपट निर्मितीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा चित्रपट भारतात 1 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा: Sameer Vidwans दिग्दर्शित 'SatyaPrem Ki Katha' चा टीझर रिलीज, Kartik Aaryan आणि Kiara Advani दिसणार दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)