IND VS NZ: हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो! क्रिकेटपटू Shubhaman Gill ला बघून थेट मैदानात प्रेक्षकांची मिश्कील घोषणाबाजी

भारत विरुध्द न्यूझिलंडच्या अंतीम सामन्यात थेट लाईव्ह क्रिकेट सुरु असताना प्रेक्षक शुभमन गिलला बघून हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो! अशा मिश्कील घोषणा देवू लागले.

भारतीय संघाचा नवा, तडफदार, तरुण आणि एकावर एक शतक मारणार क्रिकेटपटू शुभमन गिल त्याच्या क्रिकेटच्या कामगिरी प्रमाणेचं त्याच्या खासगी आयुष्याबाबत देखील चर्चेत असतो. सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या माहिती प्रमाणे क्रिकेटपटू शुभमन गिल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलकरांची लेक सारा तेंडूलकरला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खान बरोबर देखील पापाराझींनी फोटो शेअर केले होते. तेव्हापासून खान आणि तेंडूलकर अशा दोन्ही सारा बरोबर शुभमनचं नाव जोडण्यात येवू लागलं. आता तर भारत विरुध्द न्यूझिलंडच्या अंतीम सामन्यात थेट लाईव्ह क्रिकेट सुरु असताना प्रेक्षक शुभमन गिलला बघून हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो! अशा मिश्कील घोषणा देवू लागले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement