IND vs SA 2nd Test Live Update: दक्षिण आफ्रिकेचा 34 धावांत पडल्या सहा विकेट, मोहम्मद सिराजचा घातक 'पंजा'

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजीला करताना दक्षिण आफ्रिकेने सहा विकेट गमावल्या आहेत. मोहम्मद सिराजने मार्को जॅनसेनला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर यान्सेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 34/6

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement