WI vs SA, 2nd T20I Toss Update: दक्षिण आफ्रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

WI vs SA: वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

WI vs SA, 2nd T20I Toss Update: दक्षिण आफ्रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
WI vs SA (Photo Credit - X)

West Indies Cricket Team vs South Africa National Cricket Team: तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (West Indies Cricket Team) आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यात त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलकडे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम करत आहे. आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): अलिक अथानाझे, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, मॅथ्यू फोर्ड, शामर जोसेफ

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, डोनोव्हन फेरेरा, पॅट्रिक क्रुगर, ब्योर्न फॉर्च्युइन, लिझाद विल्यम्स, क्वेना माफाका, ओटनील बार्टमन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2024 12:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).