South Africa Beat England: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीत जवळपास निश्चित केले स्थान
टी-20 विश्वचषकाचा 45 वा सामना (T20 World Cup 2024) आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा पाचवा सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे.
SA vs ENG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 45 वा सामना (T20 World Cup 2024) आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा पाचवा सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 156 धावा करता आल्या. इंग्लंड संघाकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 53 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.
South Africa defeat defending champions England to stay unbeaten!https://t.co/1w4k2aSOOs | #ENGvSA | #T20WorldCup pic.twitter.com/1oJXCdmFOR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 11:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

