South Africa Beat India: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर पाच गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पाच विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.
IND vs SA, 2nd T20I: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. हा सामना गकेबरहा शहरातील सेंट जॉर्ज पोर्क येथे खेळला गेला. रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पाच विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 19.3 षटकांत सात गडी गमावून 180 धावा केल्या. टीम इंडियाच्या वतीने रिंकू सिंगने शानदार फलंदाजी करत 68 धावांची नाबाद खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अवघ्या 13.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 49 धावा केल्या. टीम इंडियाकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 14 डिसेंबरला होणार आहे.