Smriti Mandhana: स्म्रीती मंधाना रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये सामील, हिटमॅननंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय खेळाडू

या दोघांशिवाय, कोणत्याही भारतीय सलामीवीराला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2000 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

Smriti Mandhana And Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलामीवीर म्हणून T20I क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दुसरीकडे, जर आपण पुरुष आणि महिला क्रिकेटबद्दल बोललो तर स्म्रीती मंधानापूर्वी केवळ भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) हा पराक्रम केला होता. रोहित शर्माने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून 2973 धावा केल्या आहेत. या दोघांशिवाय, कोणत्याही भारतीय सलामीवीराला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2000 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

सलामीवीर म्हणून T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज-

रोहित शर्मा - 2973

स्म्रीती मंधाना - 2004

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement