SL vs WI 1st Test: सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा पदार्पणवीर Jeremy Solozano याच्या डोक्याला दुखापत, रुग्णालयात केले दाखल

वेस्ट इंडिज संघ श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. Galle येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विंडीजचा पदार्पणवीर जेरमी सोलोझानोला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना सामन्याच्या 24 व्या षटकात घडली.

SL vs WI 1st Test: सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा पदार्पणवीर Jeremy Solozano याच्या डोक्याला दुखापत, रुग्णालयात केले दाखल
जेरमी सोलोजानोला दुखापत (Photo Credit: PTI)

वेस्ट इंडिज (West Indies) संघ श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. Galle येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात मोठी दुर्घटना घडली. पहिली कसोटी खेळत असताना विंडीजचा पदार्पणवीर जेरमी सोलोजानोला (Jeremy Solozano) क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. जेरमी फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. जेरमीने हेल्मेट घातले होते मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात पाठवावे लागले. ही घटना सामन्याच्या 24 व्या षटकात घडली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2021 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).