SL vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, प्रशिक्षक Andrew McDonald कोविड-19 साठी पॉझिटिव्ह; पहिल्या सामन्याला मुकणार

AUS vs SL 2022 Series: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाला श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आढळली आहे. अलीकडेच जस्टिन लँगरच्या जागी उच्च पदावर मॅकडोनाल्डची नियुक्ती करण्यात आली आहे. मॅकडोनाल्ड मेलबर्नमध्येच राहणार असल्याची पुष्टी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे.

पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियाचे अंतरिम प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून श्रीलंकेच्या दौऱ्यावरील पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा मंगळवारी (७ जून) तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने सुरू होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement