SL Players Refuse to Shake Hands with BAN Players: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला, Angelo Mathews ला आऊट दिल्याने संघ संतप्त, पाहा व्हायरल व्हिडिओ (Video)

पहिल्या चेंडूला सामोरे जाण्याच्या तयारीसाठी वेळ लागल्याने मॅथ्यूजला टाईमआऊट देण्यात आले. अशा प्रकारे तो टाईम आऊट होणारा पहिला खेळाडू ठरला.

SL Players Refuse to Shake Hands with BAN Players

SL Players Refuse to Shake Hands with BAN Players: क्रिकेट विश्वात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील वैर कोणापासूनही लपून राहिलेले नाही. जेव्हा-जेव्हा या दोन्ही संघांमध्ये स्पर्धा असते तेव्हा-तेव्हा काही विवाद घडतात. आता बांगलादेशने विश्वचषकात श्रीलंकेचा पराभव केल्यावर श्रीलंका संघाच्या खेळाडूंनी सामना संपल्यानंतर बांगलादेशशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. अँजेलो मॅथ्यूजचा टाइम आऊट हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या चेंडूला सामोरे जाण्याच्या तयारीसाठी वेळ लागल्याने मॅथ्यूजला टाईमआऊट देण्यात आले. अशा प्रकारे तो टाईम आऊट होणारा पहिला खेळाडू ठरला. यानंतर संपूर्ण सामन्यात खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली. मात्र, सामन्याच्या शेवटी श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशच्या खेळाडूंशी पारंपरिक पद्धतीने हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

बांगलादेशने श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेने 279 धावा केल्या होत्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना बांगलादेशी संघाने 41.1 षटकात 7 गडी गमावून 282 धावा केल्या आणि सामना जिंकला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाने प्रथमच श्रीलंकेचा पराभव केला आहे. (हेही वाचा: विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने प्रथमच श्रीलंकेचा केला पराभव, 3 संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)