IND vs NZ 3rd T20 Live: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलने (Shubman Gill) ऐतिहासिक खेळी केली. खेळाच्या सर्वात लहान स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा तो भारतीय खेळाडू ठरला. या खेळीत त्याने 63 चेंडूंचा सामना करत नाबाद 126 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला. आशिया चषक 2022 मध्ये कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली होती. कोहलीचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. योगायोग पाहा, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गिलने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून एक नवा भारतीय विक्रमही केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)