Shubman Gill New Record: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमन गिलने शतक ठोकून रचला इतिहास, विराट - शिखर धवनचा मोडला 'हा' खास विक्रम
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार शतक ठोकुन इतिहास रचला आहे. शुभमन गिलने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम करुन विराट कोहली आणि शिखर धवनचा खास विक्रम मोडला आहे.
IND vs NZ 1st ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, भारताचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार शतक ठोकुन इतिहास रचला आहे. शुभमन गिलने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम करुन विराट कोहली आणि शिखर धवनचा खास विक्रम मोडला आहे. गिलने 106 धावा करुन भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जलद 1000 हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट आणि धवनने एकदिवसीय सामन्यांच्या 24-24 डावांमध्ये टीम इंडियासाठी सर्वात जलद एक हजार धावा एकत्रितपणे पूर्ण केल्या आहेत. दुसरीकडे, युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांच्या 19 डावांमध्ये 1005 धावा केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)