IND vs ENG, 3rd ODI: शुभमन गिलने रचला इतिहास; एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा बनला फलंदाज
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इतिहास रचला आहे. शुभमन गिल हा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा फलंदाज बनला आहे
IND vs ENG, 3rd ODI: शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात (IND vs ENG 3rd ODIs) इतिहास रचला आहे. शुभमन गिल(Shubman Gill) हा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा फलंदाज बनला आहे. गिलने त्याच्या 50 व्या डावात एकदिवसीय सामन्यात 2500 धावा पूर्ण केल्या आहेत. गिलने त्याच्या या कामगिरीने हाशिम अमलाचा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडला आहे. हाशिम अमलाने एकदिवसीय सामन्याच्या 51 व्या डावात 2500 धावा पूर्ण केल्या. तर गिलने केवळ 50 व्या डावात 2500 धावा पूर्ण करून इतिहास रचला.
शुभमन एकदिवसीय इतिहासात सर्वात जलद 2500 धावा करणारा खेळाडू ठरला
50 डाव: शुभमन गिल
51 डाव: हाशिम आमला
52 डाव: इमाम उल हक
56 डाव: व्हिव्ह रिचर्ड्स
56 डाव: जोनाथन ट्रॉट
भारताचा प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)