Google Year in Search 2023: शुबमन गिलचा या वर्षी पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 10 लोकांमध्ये समावेश, बाबर आझम बाहेर

गुगलने विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक शोधले गेलेले खेळाडू, तारे आणि गोष्टींची यादी जाहीर केली आहे. यावर्षी भारतातील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल अव्वल स्थानी आहे. 2023 हे वर्ष शुभमन गिलसाठी अतुलनीय होते जिथे तो कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये चमकला. दरम्यान, शुभमन गिलचा पाकिस्तानमध्येही बोलबाला राहिला आहे. या वर्षी पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 10 लोकांमध्ये शुबमन गिलचा समावेश झाला आहे तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम यादीतुन बाहेर आहे. (हे देखील वाचा: South Africa Beat India: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर पाच गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now