विश्वचषक स्पर्धेत Shreyas Iyer ने लगावला सर्वात लांब षटकार, ग्लेन मॅक्सवेलला टाकले मागे (Watch Video)
या सामन्यात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आपल्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीत विशेष कामगिरी केली आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 106 मीटरचा सर्वात लांब षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. श्रेयस अय्यरच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता.
विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आपल्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीत विशेष कामगिरी केली आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 106 मीटरचा सर्वात लांब षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. श्रेयस अय्यरच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 104 मीटरचा षटकार मारला होता. या सामन्यात कांगारू फलंदाजाने केवळ 24 चेंडूंचा सामना करत 41 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान, त्याच्या बॅटमधून अनेक नेत्रदीपक शॉट्स आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)