Shreyas Iyer ने वाढवला भारतीय संघाचा ताण, शस्त्रक्रियेमुळे दोन मोठ्या टूर्नामेंटमधून बाहेर

मुंबईतील डॉक्टरांशी झालेल्या तिसऱ्या भेटीनंतर अय्यरला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

Shreyas Iyer (Phhoto Credit - Twitter)

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) संघाचा तणाव वाढवला आहे. श्रेयस अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दिवसापासून श्रेयस अय्यर क्रिकेटपासून दूर आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरची शस्त्रक्रिया बीसीसीआयच्या कठोर मार्गदर्शनाखाली लंडन किंवा भारतात केली जाईल. मुंबईतील डॉक्टरांशी झालेल्या तिसऱ्या भेटीनंतर अय्यरला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. शस्त्रक्रियेनंतर अय्यरला किमान पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. याचा अर्थ श्रेयस अय्यर आगामी आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडेल. आगामी विश्वचषक स्पर्धेत अय्यर खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. अय्यर जर विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त असेल तर त्याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता नाही कारण एकही सामना न खेळता त्याला संघात घेणे योग्य ठरणार नाही.